शेतक-यांसाठी अजित पवारांचे लालबागच्या राजाला साकडे

शेतक-यांसाठी अजित पवारांचे लालबागच्या राजाला साकडे

मुंबई | लालबागच्या राजाचे कुटुंबातील सदस्यांसोबत अजित पवारांनी दर्शन घेतले यावेळी अजित पवार यांनी राज्यातल्या दुष्काळाचे सावट असलेल्या भागांत किमान परतीचा पाऊस तरी चांगला पडावा, असे साकडे गणरायाला घातले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, सदानंद सुळे हे देखील उपस्थित होते.

सालाबादाप्रमाणे यंदाही लालबागच्या राजा चरणी भाविकांसोबतच नेतेमंडळी आणि सेलिब्रिटींची गर्दी सुरुच आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्याचे पहायला मिळाले. प्रथमच सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.


Next Story
Share it
Top
To Top