माटुंगा फुलमार्केटच्या बाप्पाला फुलांची आरास

माटुंगा फुलमार्केटच्या बाप्पाला फुलांची आरास

मुंबई | गणरायाच्या स्वागतात आणि नंतर त्याच्या पुजेत फुलांचे असलेले महत्त्व आजही अबाधित आहे. श्रावणापासूनच विविधरंगी फुलांनी, पत्रींनी, तोरणांनी फुलांच्या मंडया सजू लागतात. खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते. या मंडयांमध्ये लक्षावधी रुपयांची उलाढाल होत असते. कित्येकांना रोजगार मिळतो. गणेशोत्सवाच्या निमित्ताने माटुंगा येथील फुलमार्केटचा गणपती म्हणजे श्री विनायगर असोसिएशन मंडळा तर्फे गेली ४६ वर्ष गणेशोत्सव साजरा केला जातो आहे.

या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी संपूर्णपणे मंडळाची सजावट ही ताज्या फुलांनी करण्यात येते. आगमन आणि विसर्जन मिरवणुकीतील फुलांचा रथ हे या मंडळाचे वैशिष्ट्य असते. आकर्षक मंडप, फुलांची आरास एवढीच माफक सजावट असलेला या मंडळाचा गणपतीबाप्पा माटुंग्यात सर्वांचा लाडका आहे. दर तीन दिवसांनी सजावट बदलण्यात येते. त्याचप्रमाणे ही सजावट करणारे कारागिर खास तामिळनाडू वरून बोलविण्यात येतात. त्याचप्रमाणे ५ फुटची मातीची मूर्ती बसविण्यात येते. या मंडळाकडून दरवर्षी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो.


Next Story
Share it
Top
To Top