Anant Chaturdashi | "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी ११ दिवस आधीच येणार"

Anant Chaturdashi | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी ११ दिवस आधीच  येणार

मुंबई । बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी सर्व गणेशभक्त 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!' अशी विनंती करत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यास सुरुवात झाली आहे. बाप्पाने ही विनवणी या वर्षी जरी नसेल ऐकली. तरी पुढच्या वर्षी मात्र बाप्पाने आपल्या भक्तच्या प्रार्थनेला मान देत ११ दिवस अगोदर म्हणजे २ सप्टेंबर २०१९ रोजी आगमन होणार आहे.

बाप्पाला आज (२३ सप्टेंबर) रोजी अनंत चतुर्दशी मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला. विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीमुळे ध्वनी प्रदूषण होते. म्हणून मुंबई उच्च न्यायालयने यावर बंदी घातली आहे. तसेच जल प्रदूषण टाळण्यासाठी शासनाने कत्रिम तलावाची निर्मिती केली आहे.

संबंधित बातम्या

LIVE UPDATE : “बाप्पा निघाले, गावाला चैन पडेना आम्हाला”


Next Story
Share it
Top
To Top