HW News Marathi
मनोरंजन

आगमन बाप्पाचे | कोकणात जाणाऱ्या एसटीचे गणपती आरक्षण फुल्ल 

मुंबई | कोकणात गणपतीच्या सणाला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाकडून २,२२५ बसगाड्यां सोडण्यात आले आहेत. दरम्यान यामध्ये एक महिना आधी ऑनलाइन आरक्षण करण्याची संधी एसटी महामंडळाने दिली असून आतापर्यंत ८६६ बसचे आरक्षण फुल्ल झाले आहेत.

गेल्या वर्षी गणपती सणसाठी २,१२१ बसगाड्या सोडण्यात आल्या होत्या. या गाड्या सोडतानाच त्यावेळी १३०० पेक्षा जास्त गाड्यांचे बुकिंग झाले होते. एसटी महामंडळाकडून ८ ते १२ सप्टेंबर या कालावधीदरम्यान २,२२५ जादा बसगाड्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. चाकरमान्यांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिल्याने आतापर्यंत ८६६ बसचे आरक्षण पूर्ण झाले आहे. मुंबई विभागातून आजपर्यंत ६११, तर ठाणे विभागातून २२५ गाड्यांची आगाऊ नोंदणी झाली आहे.

आरक्षणाची सुविधा १२ ऑगस्टपर्यंत सुरू होती. तर मुंबई विभागामधील मुंबई सेंट्रल आगारातील तर २५९ गाड्यांचे ग्रुप बुकिंग झाल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिनेत्री मीना कुमारी यांच्या स्मृतिदिना निमित्त गुगलचे खास डूडल

News Desk

नरेंद्र मोदींच्या संघ विचारधारेवर महेश भट्ट यांची टीका

News Desk

Ganesh Chaturthi 2018 | मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणराज विराजमान

News Desk