गणेशगल्लीच्या राजाचे प्रथम मुख दर्शन

गणेशगल्लीच्या राजाचे प्रथम मुख दर्शन

स्वातंत्र्यपूर्व काळात १९२८ च्या दरम्यान गणेशगल्लीतील काही नागरिकांनी एकत्र येत ‘लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळा’ची स्थापना केली आणि या भागातील पहिला सार्वजनिक गणपती बसवला. १९४२ च्या स्वातंत्र्यलढय़ात समाजप्रबोधनाची परंपरा जोपासणाऱ्या या मंडळाने आपल्या गणपतीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे रूपा दिले. स्वातंत्र्यदेवीचा रथ घेऊन सुभाषबाबूंच्या रूपात हा गणपती क्रांतीची प्रेरणा घेऊन आला होता. याला एक जवळचा धागाही होता. गणेशगल्लीच्या टोकाला असलेल्या बटाटा मेन्शनमध्ये पहिल्या मजल्यावर सुभाषबाबू काही काळ वास्तव्याला होते.

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेश गल्ली हे लालबाग विभागातील सर्वात जुने व मानाचे पाहिले मंडळ मानले जाते.1977 साली सुवर्ण मोहत्सवी वर्षानिमित्त मंडळाने 22 फूट उंच अशी बाप्पाची मूर्ती साकारल्यामुळे लालबाग हे नाव बाप्पाच्या जगभरात असलेल्या भक्तांमध्ये प्रसिद्ध झाले.


Next Story
Share it
Top
To Top