Ganesh Chaturthi 2018 | मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणराज विराजमान

Ganesh Chaturthi 2018 | मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणराज विराजमान

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांच्या निवासस्थानी 'वर्षा' येथे श्री गणेशाची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने देशभरात अत्यंत उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ढोल-ताशाच्या साथीने नाचत-गात, "गणपती बाप्पा मोरया" च्या गजरात अत्यंत प्रसन्न अशा मनाने आज घराघरांत बाप्पा विराजमान होणार आहेत. या विघ्नहर्त्याच्या आगमनाने वातावरणात वेगळाच उत्साह, अनुभवायला मिळत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या बाप्पाचे सर्वसामान्य जनतेला ट्विटरद्वारे गुरुवारी दर्शन घेता आले.बळीराजा सुखी होऊ दे, राज्यवारील संकटांचे गणराया हरण करोत. अशी गणराया चरणी प्रार्थना केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र, देशवासीय तसेच विश्वातील गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सामाजिक संघटनासाठी सुरू केल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1040134036738387968

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1040092297524850688


Next Story
Share it
Top
To Top