लालबागच्या राजाच्या चरणी सोन्याची गणेश मुर्ती अर्पण

लालबागच्या राजाच्या चरणी सोन्याची गणेश मुर्ती अर्पण

मुंबई | लालबागाचा राजाच्या चरणी दरवर्षी भाविक मोठ्या प्रमाणात दान देतात. यंदाही एका भाविकांनी लालबागचा राजाची १ किलो २७१ ग्रॅमची सोन्याची प्रतिकृती अर्पण केली आहे. ही मुर्ती अतिशय आकर्षक अशी असून या मुर्तीच्या मुकुटात हिरे जडले आहे. ही सोन्याची मूर्ती भरीव असून तिची किंमत जवळपास ४२ लाख रुपये इतकी आहे. गेल्या पाच दिवसांपासून लालबागच्या राज्याच्या चरणी दोन कोटी ६४ लाख रुपयांचे दान जमा झाले आहे.

गतवर्षी एका भाविकाने ३१.५ लाखाची सोन्याची गणेश मुर्ती लालबागचा राजाला अर्पण केली होती. यात सोने आणि चांदीच्या मुर्तींसह दागिन्यांचा समावेश होता. लालबागाच्या राजाच्या चरणी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दर्शन घेतले आहे.


Next Story
Share it
Top
To Top