आगमन बाप्पाचे | गणेशोत्सवासाठी वाद्यांना मोठी मागणी

आगमन बाप्पाचे | गणेशोत्सवासाठी वाद्यांना मोठी मागणी

[vc_row][vc_column][vc_column_text]धनंजय दळवी | आता गणेशोत्सव अवघ्या ११ दिवसांवर येऊन ठेपल्याने, भजनी बुवा आणि गणेश मंडळांनी स्वत:कडे असलेली तालवाद्ये दुरुस्तीसाठी काढली आहेत, तर काहींनी नव्याने खरेदी करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे या काळात तालवाद्यांना मोठी मागणी असते. गणेशोत्सव म्हटला की, भजन आणि आरत्यांची आरास आलीच. त्यामुळे दादरच्या मार्केटमध्ये तालवाद्यांसाठी मोठी वर्दळ दिसून येत आहे. ढोलकी, मृदंग, तबला, डग्गा, पखवाज या वाद्यांची आवक वाढली आहे.

मुंबईतल्या तालवाद्यांना कोकणात चांगली मागणी असल्यामुळे, शहरातील लोक कोकणात तालवाद्ये नेण्यासाठी एकच गर्दी करू लागले आहेत. दादरच्या बाजारात तालवाद्य, ढोलकीला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसून आले. गणपतीच्या आरतीसाठी ढोलकी हे वाद्य प्रामुख्याने लागते. त्यामुळे ढोलकीच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तालवाद्यांच्या चामड्याची गॅरंटी दिली जात नाही, परंतु वाद्याचे खोड किंवा इतर भाग नादुरुस्त झाल्यास, त्यावर स्वत: प्रयोग न करता थेट कारागिरांकडे घेऊन येण्याचा असा सल्ला विक्रेत्यांनी दिला. ही वाद्य लाकडी आणि पुठ्यांचे अश्या दोन्ही प्रकारात मिळतात. यावर बकरीच्या चामड्याचे आवरण असते.

अश्याप्रकारे आहेत तालवाद्यांचे दर

लाकडी ढोलकी पंधराशे ते साडेतीन हजार, तर पुठ्यांची ढोलकी ४५० ते ५०० रुपये, तबला आणि डग्गा पाच ते साडेपाच हजार, मृदुंग सहा ते साडेसात हजार, कांस्याचे (काशाचे) टाळ ५०० ते ८०० रुपये आणि पितळीचे टाळ ४०० ते ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. सर्व वाद्य दहिसर येथे बनवली जातात. तसेच तालवाद्यांसाठी लागणारे चामडे बकरीचे वापरले जाते, अशी माहिती तालवाद्यांचे विक्रेत्यांनी एच डब्लूला दिली.[/vc_column_text][/vc_column][/vc_row][vc_row][vc_column][vc_gallery type="nivo" interval="3" images="18743,18744" onclick=""][/vc_column][/vc_row]


Next Story
Share it
Top
To Top