लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी जाणार असाल तर सावधान !

लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी जाणार असाल तर सावधान !

मुंबई । महाराष्ट्रात गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. गणेश भक्त लालबागच्य२ राजाच्या दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. या गर्दीचा फायदा घेऊन पाकीट मारणची चांगलीच चंगळ झाली आहे. लालबाग परिसरात अन्य ठिकठिकाणी गणपती बाप्पा मंडळात विराजमान होऊन चार दिवस उलटले आहे. परंतु याच गर्दीचा फायदा घेऊन चोरटे गणेश भक्तांच्या पाकीटावर हात सफाई करत होते.

तसेच लालबाग परिसरातील काळाचौकी पोलीस ठाण्यात गेल्या चार दिवसांपासून जवळपास १३५ मोबाईल चोरीच्या तक्रारीची नोंद करण्यात आली. मोबाईलच्या तक्रारी नोंदवताना पोलिसांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. मोबाईल चोरीच्या सर्वात जास्त तक्रारी या लालबागचा राजा परिसरात घडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबईतील गणेशोत्सवात लालबाग आणि परळ भागातून गणपती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक गर्दी करतात. या गणेश भक्तांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमे-यांची सोय केली असून यांच्या आधारे या पाकीट मारांचा पोलीस शोध घेत आहेत. गतवर्षी देखील गणेशोत्सवाच्या काळात पाकीट मार भुरट्या चोरींचा सुळसुळाट होता. तेव्हा पोलिसांनी दोन चो-यांच्या टोळ्या सुरत गॅग आणि यूपी गॅग आशी या दोन्ही टोळीची नावे होती.


Next Story
Share it
Top
To Top