विसर्जनाला जाताय तर, हे वाचा !

विसर्जनाला जाताय तर, हे वाचा !

मुंबई । गेल्या महिना भरापासून मुंबईच्या समुद्र किनारी ब्ल्यू बॉटल जेली फिशची दहशत कायम आहे. मुंबईत गणेशोत्सवाची धामधुम सुरू आहे. तसेच मुंबईत आज (१७सप्टेंबर) पाच दिवसांच्या बाप्पाचे विसर्जनाला सुरुवात झाली आहे. परंतु बाप्पाला भावपुर्व निरोप देण्यासाठी गेलेल्या भक्तांना जेली फिशचा गंश होऊ नये, आणि दंश झालाच तर तातडीने उपचार करण्यासाठी पालिकेच्या वतीने दादर चौपाटी येथे प्राथिमक आरोग्य केंद्र उभारले आहे. या आरोग्य केंद्रात ब्ल्यू बॉटल जेलीफशचा दंश आणि अन्य कोणत्या प्रकारच्या आरोग्य समस्याचा येथे मोफत स्वरुपात प्रथमोपचार केले जाणार आहे.

बाप्पाच्या विसर्जनासाठी येणा-या भाविकांसाठी पालिकेच्या वतीने प्रत्येक ठिकांनी सुचना फलक लावले आहे. या फलकात ब्ल्यू बॉटल जेलीफीश, स्टिंग रे, जेलीफीश आणि इल अशा प्रकारच्या उपद्रवी जलचर प्राणी सावधान राहण्यास सांगितले आहे. मुंबईच्या समुद्र किनारी ब्ल्यु बॉटल जेलीफिश

गणेश भक्तांसाठी खबरदारीच्या सूचना

१) कोणत्याही व्यक्तीने अनवनी समुद्राच्या पाण्यात जाऊ नये

२) महापालिकेने केलेल्या विसर्जनाच्या व्यवस्था म्हणजे विनामुल्य तराफ्यांचा वापर करावा.

३) एखाद्या भाविकास मत्स्यदंश झाल्यास महापालिकेच्या समुद्रकिना-यावरील प्रथमोपचार केंद्रात जाऊन विनामूल्य वैद्यकिय सेवा प्राप्त करावी

४) मद्यप्राशन करुन समुद्रकिना-यावर विसर्जन स्थळी जाऊ नये कारण व्यक्तींवर मत्स्यदंशावरील वैद्यकीय उपचारांची परिणामकता घटते.

अशा प्रकारे प्रथमोपचार करण्यात येणार आहे.

दंशझालेल्या ठिकाणी कमीत कमी ३० संकेद व्हिनेगर लावणे

जखम साफ करणे

दंश निष्क्रिय करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करणे

असे उपचार केले जातील असे फलक दादर चौपाटीवर लावण्यात आले असून पोलीस वेळोवेळी भाविकांना सुचना देत आहेत.


Next Story
Share it
Top
To Top