आगमन बाप्पाचे | इको फ्रेंडली गणपती साजरा करण्यासाठी नाहर ग्रुप तर्फे दोनशे रहिवाशांना प्रोत्साहन

आगमन बाप्पाचे | इको फ्रेंडली गणपती साजरा करण्यासाठी नाहर ग्रुप तर्फे दोनशे रहिवाशांना प्रोत्साहन

मुंबई | गणेशोत्सव जवळ आला आहे. आणि मुंबईतील बाजारात इकोफ्रेंडली गणपती आणि मखरांचे पर्याय उपलब्ध आहेत. पण सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. यासाठी मागील काही वर्षांपासून नाहर ग्रुप तर्फे इकोफ्रेंडली गणपती आणि मखरांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येते.

दरवर्षी प्रमाणे 'गो ग्रीन' चा संदेश देण्याची प्रथा यंदा ही सुरु ठेवली आहे. नाहर ग्रुपने त्यांच्या 'अवर ग्रीन गणेशा' या इनिशिएटिव्हसाठी मुंबईतील चांदिवली येथे नाहर इंटरनॅशनल स्कुलमध्ये ६ , ७ सप्टेंबर रोजी दोन कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. इको डेकॉर व ग्रीन गणेशा बनविण्यासाठी असणाऱ्या या कार्यशाळेमध्ये नाहरच्या अम्रित शक्ती टाउनशिप मधील २०० रहिवाश्यांनी सहभाग घेतला.

पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस)ला समुद्र देखील स्वीकार करत नाही. ज्यामुळे विसर्जनानंतर समुद्री जीवांना आणि पर्यावरणाला नुकसान होतं. त्याचा वापर न करता शाडू मातीचा वापर करून पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती व मखरांची सजावट बनविण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते.


Next Story
Share it
Top
To Top