लालबागचा राजा मंडळात झालेल्या धक्काबुकी प्रकरणी धर्मादाय आयुक्त डिगेंची चौकशी

लालबागचा राजा मंडळात झालेल्या धक्काबुकी प्रकरणी धर्मादाय आयुक्त डिगेंची चौकशी

मुंबई । लालबागचा राजा मंडळात काल (मंगळवार १८) घडलेल्या संतापजनक प्रकाराबाबत सर्व स्तरातून टीका झाल्या. त्यानंतर घडलेल्या प्रकारची दखल घेत त्याची चौकशी करण्यासाठी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे नुकतेच लालबागचा राजा मंडळाच्या मंडपात दाखल झाले. डिगे काल आयपीएस अधिकाऱ्यासोबत केलेल्या धक्काबुक्की आणि मुजोरी केल्याप्रकरणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडे चौकशी केली.

आयुक्तांनी घेतलेल्या या दखलीमुळे लालबागचा राजा मंडळावर सरकारचे नियंत्रण तर येणार नाही ना ? असे प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत. डिगे यांना सचिव साळवी यांनी कालचे प्रकरण मिटले असून पुन्हा असा प्रकार घडणार नसल्याची ग्वाही दिली.

गणेशोत्सवादरम्यान या मंडळाच्या सुरक्षेसाठी दरवर्षी राज्य सरकारचे लाखो रुपये खर्च होतात. तसेच या मंडळात कार्यकर्त्यांची वाढलेली मुजोरी पाहता या मंडळावर सरकारचे नियंत्रण असावे अशा चर्चांना गेल्या अनेक वर्षांपासून उधाण आले आहे. मात्र, या मंडळात दरवर्षी होणारी दादागिरीला लगाम लावण्यासाठी राज्य सरकार महत्वाचे पाऊल उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Next Story
Share it
Top
To Top