लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान मोठा अनर्थ टळला

लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान मोठा अनर्थ टळला

मुंबई | गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या अपघातात कोणतीही जिवीत हाणी झालेली नाही. लालबागच्या राजाचे विसर्जन सोमवारी सकाळी करण्यात आले. रविवारी सकाळी निघालेली ही विसर्जन मिरवणुक तब्बल २२ तासांनी लालबाग वरुन गिरगावच्या समुद्र किनारी पोहचली. विसर्जना दरम्यान बुडलेल्या बोटीतील सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. यावेळी बुडलेल्या महिलेसह एका मुलाला उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गतवर्षी प्रमाणे यंदाही बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर या असे आवाहन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने मुंबईकरांनी समुद्र किनारी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. यावेळी आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्तांनी गिरगावच्या चौपाटीतवर भक्तिमय वातावरणात निरोप दिला. तब्बल २२ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले.


Next Story
Share it
Top
To Top