राजाच्या दरबारी पोलीस कर्मचा-याला धक्काबुक्की

राजाच्या दरबारी पोलीस कर्मचा-याला धक्काबुक्की

मुंबई | मुंबईतील सुप्रसिद्ध गणपती असलेल्या लालबागच्या राजाच्या दरबारात पुन्हा एकदा हाणामारीची घटना घडली आहे. झोन ३ चे पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्याशी मुजोरी करत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली आहे. हा प्रकार मंगळवारी घडला आहे. स्थानिक रहिवाशी आणि कार्यकर्ते हे रांगेशिवाय आपल्या ओळखीच्या व्यक्तींना थेट स्टेजवर चढून चरणस्पर्श घेण्यासाठी गणपती समोर एक मार्ग खुला ठेवण्यात आला आहे.

या खुल्या मार्गाद्वारे अतिमहत्वाच्या व्यक्तींना आणि ओळखीच्या व्यक्तींना रांगेशिवाय दर्शन दिले जाते. त्याचठिकाणी लालबागचा राजा मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्याशी आधी शाब्दिक बाचाबाची झाली. त्यांनतर पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर कार्यकर्ते धावून गेले. ही अरेरावी पाहून पोलीस उपायुक्त आणि अन्य पोलीस अधिकारी संतापल्यामुळे या ठिकाणी धक्काबुक्कीचा प्रकार घडला आहे.

[video width="640" height="352" mp4="https://hwmarathi.in/wp-content/uploads/2018/09/WhatsApp-Video-2018-09-18-at-6.33.24-PM.mp4"][/video]


Next Story
Share it
Top
To Top