मुंबई | एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या समाजात आजही मासिक पाळीविषयीचे अज्ञान आणि गैरसमज आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील ६० टक्क्यांहून अधिक मुली ‘त्या’ दिवसांमध्ये शाळेत जात नाहीत.
मासिक पाळीचे जगाच्या पाठीवर अनेक देशात स्वागत केले जाते. पण आपल्या देशात काहीना तर मासिक पाळी या शब्दाचा केवळ उच्चार करणेही विटाळ वाटतो. त्याचबरोबर मासिक पाळीबद्दल अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धाही कायम आहेत. आम्हाला बाहेरच बसावे लागते. तसा शिरस्ताच आहे. आम्ही आणि पोरीही कपडेच लावतो,काय करणार,' हे उद्गार अजूनही ऐकू येतात.
हाच विषय सोबत घेऊन धारावीमधील, काळाकिल्ला येथील श्री हनुमान सेवा मंडळाने यंदा गणेशोत्सवात " चला एका अनवट विषयावर बोलू काही" समाजातील महत्वाच्या अशा मासिक पाळीवर महिती देणारी चित्रफीत सजावट बनवली आहे.