बाप्पाच्या वाळू शिल्पातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

बाप्पाच्या वाळू शिल्पातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

मुंबई | संपुर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवात जल्लोष साजरा होत आहे. अनेक मंडळ गणेशोत्सवात वेगवेगळे सामाजिक संदेश देतात. जुहू चौपाटीवर वाळूशिल्पकार लक्ष्मी गौड यांनी १२ फूट वाळूमध्ये गणपती बाप्पाची मुर्ती उभारून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. गौड यांचे वाळूशिल्प पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. सर्वसामान्य लोकांना पर्यावरणाचे महत्त्व समजत असून मुंबईतील बहुतांश भक्तांचा कल इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याकडे दिसत आहे.

वाळू शिल्पकार लक्ष्मी गौड यांनी “पर्यावरण बचाव”, “से नो टू प्लॅस्टिक” असे संदेश देणारे वाळू शिल्प जुहू चौपाटीवर उभारले आहे. हे वाळू शिल्प आणि त्यावर पर्यावरण संवर्धनाचा संदेश लिहिण्यासठी एका दिवसाचा कालावधी लागला. वाळू शिल्प तयार करण्यासाठी जवळपास १० टन वाळूचा वापर करण्यात आला असून या शिल्पात नैसर्गिक नारंगी आणि हिरवा रंगाचा वापर करण्यात आला असून असे एकूण १० वेगवेगळे रंग वापरून हे वाळू शिल्प आकर्षित करण्यात आले आहे.१७ सप्टेंबर रोजी पुन्हा दुसरे वाळूशिल्प बनविण्यात येणार आहे. त्या वाळू शिल्पावर #मुंबईकर, #नो प्लॅस्टिक, #पर्यावरण बचावाचा संदेश देण्यात येणार असल्याचे लक्ष्मी गौड यांनी सांगितले.


Next Story
Share it
Top
To Top