मुंबई | लालबागचा राजा गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांमध्ये धक्का झाल्याचा प्रकार मंगळवारी घडल्याचे पहायला मिळाले. या प्रकाराचा सोशल मिडीयावर अनेकांनी निषेध देखील नोंदविला. लालबागच्या राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मुजोरी करत पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार कॅमे-यात कैद झाला आहे. असे असताना आमदार नितेश राणे यांनी या प्रकरणात मंडळाच्या कार्यकर्त्यांची बाजू घेतली आहे.
लालबागच्या राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांना उगाच बदनाम करण्यापेक्षा दुसरी बाजूही ऐकली पाहिजे. पोलिस ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना हाताळत आणि मारत आहेत ते चुकीचं आहे, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. लालबागचा राजा पोलिसांचा का स्थानिक कार्यकर्त्यांचा हे कळले नाही आहे? उगाच मंडळाची होणारी बदनामी थांबली पाहिजे, असेही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/1042023519708762113