आता बाप्पा पण झाला सिंघम?

आता बाप्पा पण झाला सिंघम?

मुंबई । महाराष्ट्रात सर्वत्र गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. दरवर्षी गणेशोत्सवात बाप्पाची वेगवेगळी रुपे पहायला मिळतात. यात काही नवल तर नाही, परंतु यंदा विले पार्ले पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे यांच्या घरी पोलिसांच्या गणवेशातील म्हणजे "सिंघन" रुपी बाप्पाची प्रतिष्ठापणा केली आहे.

काणे यांनी ऐवढ्यावरच न थांबता त्यांनी चक्क सिंघम बाप्पाच्या भोवतीची सजावट म्हणून पोलीस स्टेशन उभारले आहे. या देखाव्यात "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" असे पोलिसांचे ब्रीदवाक्य लिहले आहे. हा सिंघम बाप्पा खुर्चीत ऐटीत बसलेला पाहायला मिळत आहे. काणे हे गेल्या वर्षीपासून पोलिसांच्या गणवेशातील बाप्पाची प्रतिष्ठापणा करत आहेत. या सिंघम बाप्पाला पाहण्यासाठी गणेश भक्ती मोठ्या संख्येने येत आहेत.


Next Story
Share it
Top
To Top