Ganesh Chaturthi 2018 | 'खड्डे आणि वाहतूक कोंडीचा' देखावा साकारत गणेश भक्ताने मांडली व्यथा

Ganesh Chaturthi 2018 | खड्डे आणि वाहतूक कोंडीचा देखावा साकारत गणेश भक्ताने मांडली व्यथा

मुंबई | कल्याण शहरातील खड्डे आणि वाहतूक कोंडीने नागरिकांना रडकुंडीला आणले असताना आजपासून विराजमान झालेल्या गणेशोत्सवातही या त्रासाचे प्रतिबिंब उमटले आहे. कल्याणच्या अमित बाळापूरकर कुटुंबियांनी घरच्या गणपती बाप्पांसमोर कल्याणातील 'शहरातील खड्डे आणि वाहतूक कोंडी'चा देखावा साकारत या विघ्नातून सुटका करण्यासाठी विघनहर्त्याला साकडे घातले आहे.

रस्त्यावरील खड्डयांनी ५ निष्पाप नागरिकांचे बळी घेतले असून दुर्गाडी आणि पत्रीपुलामुळे संपूर्ण शहर वाहतूक कोंडीच्या गर्तेत अडकले आहे. त्यामूळे गणपती बाप्पालाही त्याच्या डोळ्यासमोर सतत हेच चित्र दिसत असेल. हा विचार करून आपण हा देखावा साकारल्याचे अमित बाळापूरकर यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे या देखाव्यातून सर्व संकटातून नागरिकांची सुटका व्हावी आणि कल्याण डोंबिवली महापालिकेलाही ती सुबुद्धी सुचावी यासाठी अशा प्रकारे थेट बाप्पांना साकडे घालण्यात आले आहे.


Next Story
Share it
Top
To Top