रत्नागिरी । गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले चाकरमान्यांना उत्सवानंतर पुन्हा मुंबईत परताना प्रचंड हाल झाले आहेत. मुंबईच्या दिशेने येणारी रत्नागिरी-दादर पॅसेंजर सिंधुदुर्गमधून भरुन आल्याने प्रवासी संतप्त रत्नागिरी रेल्वे स्थानाकत रोखून धरली आहे. या संतप्र प्रवाशांनी आज (मंगळवारी १८ सप्टेंबर) गेल्या चार तासापासून पॅसेंजर ट्रेन रोखली आहे.
पोलीस आणि रेल्वे अधिकारी यांनी रत्नागिरी स्थानकात प्रवाशांची समजूत काढून रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न करत आहेत. रत्नागिरीतील प्रवाशांसाठी राखीव असलेल्या डब्यामध्ये सिंधुदुर्गतूनच प्रवासी बसून आले होते. या प्रवासांनी खाली उतरावे अशी मागणी रत्नागिरतील प्रवासींनी करत पॅसेंजर ट्रेन रोखून धरली आहे.
पॅसेंजर ट्रेन रोखून धरलेल्या प्रवाशांविरोधात कारवाई करण्याचा इशारा रत्नागिरी पोलिसांनी केला. पॅसेंजर ट्रेन जवळपास चार तास रेल्वे थांबवून ठेवल्यामुळे कोकणातून परतणाऱ्या मुंबईकरांना त्रास सहन करावा लागत आहे.