मुंबई | कोकणात गणपतीच्या सणाला जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाकडून २,२२५ बसगाड्यां सोडण्यात आले आहेत. दरम्यान यामध्ये ऑनलाइन आरक्षण करण्याची संधी एसटी महामंडळाने दिली असून आतापर्यंत २००० बसचे आरक्षण फुल्ल झाले आहेत. एसटी महामंडळाकडून ८ ते १२ सप्टेंबर या कालावधीदरम्यान चाकरमान्यांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिल्याने आतापर्यंत २००० बसचे आरक्षण पूर्ण झाले आहे. मुंबई विभागातून आजपर्यंत ६११, तर ठाणे विभागातून २२५ गाड्यांची आगाऊ नोंदणी झाल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
याकाळात रेल्वे, एसटी बसेस फुल्ल होत असतानाच लक्झरी बसेसचेही दर वाढू लागल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. परिणामी लक्झरी बसेसचे हंगाम नसतानाच्या कालावधीतील दर दुप्पटीपेक्षा वाढत चालल्याची तक्रार करण्यात आली आहे. मध्य, कोकण, पश्चिम रेल्वे मार्फत जादा गाड्या सोडण्यात येतात. मात्र, ही वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत या गाड्यांची संख्या कमी पडते. दरम्यान कोकणात जाणाऱ्या साध्या लक्झरी बसेससाठी हंगाम नसतानाच्या कालावधीतील ३०० ते ३५० रुपये आकारले जातात. तेच दर आता ९०० रुपयांवर पोहोचले आहेत.