HW News Marathi
मनोरंजन

#GaneshChaturthi : जाणून घ्या…श्री गणेश स्थापनेचा मुहूर्त

मुंबई | देशभरात घरोघरी श्री गणेशाच्या आगमनला सुरुवात झाले आहे. आज (२ सप्टेंबर) मध्यान्हकाली भाद्रपद शुक्ल चतुर्थी असल्यामुळे त्याच दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी करण्यात येते. या दिवशी भक्ती भावने बाप्पाच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात येते. बाप्पाच्या प्रतिष्ठापणाचा मुहूर्त काय आहे ? असे अनेक प्रश्न आपणास पडले असेलच, तर आपण जाणून घेऊया बाप्पाच्या प्रतिष्ठापणाचा नेमका मुहूर्त किती वाजता आहे.

गणेशभक्त अगदी भक्ती भावाने बाप्पाच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा करतात. आज सकाळी पहाटे ४ वाजून ४५ मिनिटाने मुहूर्त आरंभ होणार असून दुपारी १ वाजून ४२ मिनिटांपर्यंत कधीही श्रीगणेशमूर्ती स्थापना व पूजन करावे लागणार आहे. गुरुवारी ५ सप्टेंबर रोजी दिवसभर अनुराधा नक्षत्र असल्याने दिवसभर कधीही ज्येष्ठा गौरी आणाव्यात. शुक्रवारी ६ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन आहे. शनिवारी ७ सप्टेंबर रोजी दिवसभर मूळ नक्षत्र असल्याने दिवसभर कधीही ज्येष्ठा गौरी विसर्जन करता येईल. अनंत चतुर्दशी गुरुवारी १२ सप्टेंबर रोजी आहे. त्या दिवशी सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी व रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी समुद्राला पूर्ण भरती असेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार महेश एलकुंचवार यांना जाहीर

News Desk

‘ठाकरे’ सिनेमाचा ट्रेलर लाँच

News Desk

लवकरच रीगल सिनेमागृह बंद होणार

swarit