HW News Marathi
मनोरंजन

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या एसटी बसला आग, प्रवासी थोडक्यात बचावले

रायगड | गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी एसटी बसला मुंबई-गोवा महामार्गावर आग लागली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वडपालेजवळ ही घटना घडली. या दुर्घटनाग्रस्त एसटी बसमध्ये एकूण ५७ प्रवाशी होते. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांची संख्या मोठी असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनांच्या संख्याही तितकीच मोठी आहे. अशात ही दुर्घटना घडल्याने कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या सुमारे २ ते ३ किलोमीटरच्या मोठ्या रांगा लागल्या.

ही बस गणेश भक्तांना घेऊन मुंबईतील परळ येथून रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे जात होती. देशभरात उद्या (२ सप्टेंबर) श्रीगणेशाचे आगमन होत असल्याने सर्व गणेशभक्त कोकणात जात असतात. आज सकाळीच मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याने गणेशभक्तांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. गणेशोत्सवाची सर्व करावयाची कामे वेळेत पूर्ण कशी होणार याची चिंता म्हणूनच गणेशभक्तांना सतावते आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या

News Desk

या दिवाळीत करून पहा गव्हाची शंकरपाळी

News Desk

पाच दिवसांच्या बाप्पांसोबत गौरींचे थाटात विसर्जन

News Desk