HW News Marathi
मनोरंजन

Kumbh Mela 2019 : जाणून घ्या… कुंभमेळ्याचे धार्मिक महत्व

नवी दिल्ली | हिंदू धर्मात कुंभमेळ्याला अनन्यसाधारण असे महत्व आहे. यावर्षीचा कुंभमेळा येत्या संक्रांतीपासून (१४ जानेवारी) प्रयागराज येथे सुरु होणार आहे. या कुंभमेळ्यात लाखो भाविक सहभागी होणार आहे. कुंभमेळ्यात सर्वात जास्त महत्व स्नान म्हणजे आंघोळीच असते.

कुंभमेळ्याविषयीच्या विविध मान्यता

यंदा १४ जानेवारी ते मार्च २०१९ कुंभमेळा भरणार आहे. असे मानले जाते की, कुंभमेळ्यातील स्नानामुळे स्वर्गाची प्राप्ती होते. प्रयागराज येथील कुंभ हे एक असे ठिकाण आहे जेथून सूर्याचा उदय होतो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार त्रिवेणी संगमाच्या पवित्र पाण्यात डुबकी लावल्याने माणसाच्या सर्व पापांचा नाश होतो. येथील पवित्र गंगेच्या पाण्यात आंघोळ केल्याने आपण आणि आपले पुर्वज दोषमुक्त होतात. कुंभमेळ्यातील हे स्नान माणसाला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त करते.

कुंभमेळ्यात स्नान करण्याचे काही मुख्य दिवस आहेत. ज्यादिवशी केलेल्या स्नानाला ‘शाही स्नान’ म्हटले जाते. या दिवशी मेळ्यात आलेले साधू-संत समुहाने सूर्योदयाच्या वेळी गंगा नदीत स्नान करतात. साधू-संतांच्या प्रत्येक समुहाचा एक विषेश क्रम असतो. त्यानुसारच त्या समुहाला नदीत स्नान करण्यासाठी वेळ आणि जागा दिली जाते.

प्रत्येक स्नानाचे वेगवेगळे महत्व

कुंभमेळ्यात होणाऱ्या प्रत्येक शाही स्नानाचे महत्त्व वेगवेगळे असते. या मेळ्यातील स्नानाची सुरुवात संक्रांतीपासून होणार आहे. याला शाही स्नान किंवा राजयोगी स्नान असेही म्हटले जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्टेजवरच फाटला दयाचा लेंगा

News Desk

श्रेयस चे विठ्ठला विठ्ठला  

News Desk

चिंताजनक !आतापर्यंतची सर्वाधिक वाढ, देशात एका दिवसात ४५ हजार कोरोना रुग्ण आढळले

News Desk