HW News Marathi
मनोरंजन

विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा ढोल फुटणार | गिरीश महाजन

नाशिक | राज्यभरात गणपती बाप्पाचे विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ‘लोकसभा निवडणुकीत त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळावे. तसेच विधासभेत विरोधकांचा ढोल फुटणार’, असल्याचा विश्वास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे.

शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत महाजन यांनी सहभागी होऊन ढोल वाजवून ठेका धरला. महाजांना ढोल वाजविताना पाहून मिरवणुकीतील गणेश भक्तांचा उत्साह वाढला. महाजन यांनी ढोल वाजवल्यानंतर पत्रकारांशी सवांद साधला. यावेळी महाजन म्हणाले, “गणपती बाप्पा आम्हाला प्रसन्न आहे. चांगले काम करणाऱ्यांच्यामागे गणपती बाप्पा नेहमी राहतो. तो विघ्नहर्ता आहे. लोकसभा निवडणुकीत त्याप्रमाणे विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळावे. तसेच विधासभेत विरोधकांचा ढोल फुटणार असल्याचे विश्वास त्यांनी केले.”

यावेळी रिमझिम पावसात सुरू असलेल्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत महाजन यांच्यासह महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनाही सहभाग घेतला होता.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिंताजनक !आतापर्यंतची सर्वाधिक वाढ, देशात एका दिवसात ४५ हजार कोरोना रुग्ण आढळले

News Desk

Ganesh Chaturthi 2018 | मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गणराज विराजमान

News Desk

अभिनेता शहारूख खानची मुलगी रँम्पवर

News Desk