शरद पवार ममता बॅनर्जी भेटीवर महाविकास आघाडीतील मंत्री म्हणतात....

शरद पवार ममता बॅनर्जी भेटीवर महाविकास आघाडीतील मंत्री म्हणतात....

नवी दिल्ली। गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या दौऱ्याची बातमी चांगलीच चर्चेत आहे. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर ममता बॅनर्जी अनेक राज्यांत पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. तृणमूलने त्रिपुरात प्रचाराचा वेग वाढवला आहे, तर गोवा आणि उत्तर प्रदेशात पक्षाच्या हालचाली तीव्र झाल्या आहेत. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येताना पहिल्यांदा सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेत या दौऱ्याची सुरुवात केली आहे. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ममता बॅनर्जी भेट घेणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल पक्ष हा पश्चिम बंगालसाठीच मर्यादित राहणार नसल्याचं स्पष्ट संदेश ममता बॅनर्जी यांनी गेल्या काही महिन्यांत दिला आहे. याच पार्श्वभूमीवर आता ममता बॅनर्जी यांची शरद पवारांची भेट महत्त्वपूर्ण मानली जाते.

काँग्रेसशिवाय एकजूट विरोधी पक्ष शक्य नसल्याचे स्पष्ट

शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीचा धागा पकडत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी काँग्रेसशिवाय एकजूट विरोधी पक्ष शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, ममता दीदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, त्या पवारसाहेबांना भेटणार आहेत. बैठकीनंतर त्या पत्रकारांना संबोधित करून चर्चेची माहिती देतील.जेव्हा मलिक यांना विचारण्यात आलं की टीएमसी या क्षणी काँग्रेसला बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे का? तेव्हा त्यांनी सांगितलं की तृणमूल पश्चिम बंगालच्या बाहेर आपला पाया स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येक पक्षाला हा अधिकार आहे. पण काँग्रेसला बाहेर ठेऊन भाजपच्या विरोधात एकसंध विरोधक उभारणे हे जवळपास अशक्यप्राय काम आहे. असं वक्तव्य आता महाविकासआघाडीतील मंत्री नवाब मलिक यांनी केल आहे.

भाजपला सातत्याने आव्हान देण्याचा प्रयत्न

तृणमूलच्या ममता बॅनर्जी यांची भेट महाराष्ट्र हा चर्चेचा विषय बनला आहे. कारण ममता या पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. म्हणूनच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्या भेटीचे सगळं रूप सामान्य भेटीसारखं केलं असलं तरी तृणमूलने भाजपला सातत्याने आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडे काँग्रेस आणि तृणमूल यांच्यात जोरदार वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते तृणमूलमध्ये सामील झाल्याच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये मात्र वाद झालेत.

पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक करण्याबाबत चर्चा

ममता बॅनर्जी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेऊ शकतात. यादरम्यान हे दोन्ही नेते अनेक मुद्द्यांवर चर्चा करू शकतात. ममता बॅनर्जी 1 डिसेंबरला मुंबईत होणाऱ्या यंग प्रेसिडेंट्स ऑर्गनायझेशन (वायपीओ) समिटमध्येही सहभागी होणार आहेत. यादरम्यान त्या उद्योगपतींसोबत बैठका घेणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये गुंतवणूक करण्याबाबत चर्चा करणार आहेत. वेळापत्रकानुसार ममता बॅनर्जी मुंबईत काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला भेटणार नाहीत. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसपासून पूर्ण अंतर ठेवले आहे.


Next Story
Share it
Top
To Top