संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या बलिदानाचा मुख्यमंत्र्यांना विसर; नितेश राणेंचं पत्र

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या बलिदानाचा मुख्यमंत्र्यांना विसर; नितेश राणेंचं पत्र

मुंबई | शिवसेना आणि राणे कुटुंब यांच्यातील वाद तसा जुनाच आहे. त्यात विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशात आता नारायण राणे यांचे पुत्र व भाजप आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असून यात त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांच्या बलिदानाचा मुख्यमंत्र्यांना विसर पडतोय, अशी टीका केली आहे.


काय म्हंटलंय नितेश राणेंनी पत्रात?

नितेश राणे या पत्रात म्हणतात की, "माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत १०९ मराठी हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं. या हुतात्म्यांच्या बलिदानाचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतोय कारण शिवाजी पार्क येथे या चळवळीच्या स्मृती स्मरणात राहव्यात यासाठी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून संयुक्त महाराष्ट्र कलादालनाची उभारणी करण्यात आली. त्याला आता ३० एप्रिल रोजी १२ वर्षे पूर्ण होतील, परंतु या कलादालनाकडे आपण हेतूपूरस्परपणे दुर्लक्ष करत आहात."

"महाराष्ट्र दिन तोंडावर आलेला असताना हे कलादान अद्यापही पर्यटकांसाठी खुले करण्यात आलेले नाही, ना इथे कुठली रंगरंगोटी केली गेलेली नाही. एवढच नाही तर कलादालनावर विद्युत रोषणाई करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर करून सहा महिने उलटले तरी कलादालनावर विस्मरणाचा अंधार पडलेला आहे. उलटपक्षी या कलादालनाचा उपयोग अधिकाऱ्यांच्या पार्किंगसाठी व मिटींगासाठी केला जातोय."

"स्व. बाळासाहेबांच्या हेतूला बाजूला सारत स्वत:च्याच फोटोग्राफीसाठी आपण यातील एक मजला अडवलेला आहेच आता संपूर्ण कलादालनच ठाकरे कुटुंबियांची प्रायव्हेट प्रॉपर्टी करण्याचा घाट तर आपण घालत नाहीयेत ना? अशी खदखद आता सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनात आहे. सर्वच पातळ्यांवर आपण कलादालनाचा सर्वसामान्यांना विसर पडावा यासाठीची खबरदारी घेतली जात आहे."


"कारण पर्यटन खाते युवराजांकडे असतानाही कलादालनाचा समावेश महाराष्ट्र पर्यटन विकास कॉर्पोरेशनच्या सूचित का गेला जात नाही? यावरून हेच स्पष्ट होते आहे की आपली या कलादालनाबाबत असणारी मनिषा काही वेगळीच आहे. आपण जो महाराष्ट्राच्या अस्मितेचा उसना राग आळवता किमान त्याच्याशी तरी प्रामाणिक राहून १ मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर संयुक्त महाराष्ट्र कलादानवर विद्युत रोषणाई करावी, दालन पर्यटकांना खुले करावे, याचा पर्यटन सूचित समावेश करावा आणि आपला हेतूवर उठलेलं शंकेचं मोहोळ शांत करावं", असं


Next Story
Share it
Top
To Top