मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या युवकांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत!

मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या युवकांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत!


मुंबई। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न समोर होता. म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजाकडून आंदोलन झाली. मात्र यात अनेकांना आपला प्राण देखील गमवावा लागलाय. म्हणूनच महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षणाच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत नुकतीच जाहीर केली आहे. आणि या बद्दल अशोक चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानलेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ज्या मराठा युवकांना मदत करण्यात आली त्यांची यादीच आता ट्विटरवरुन प्रसिद्ध केली आहे. सतत पाठपुरावा केल्यानं मराठा समाजातील 34 युवकांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये मदत देण्यात आल्याचं ट्विट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ही मदत जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली असून ती संबंधित कुटुबीयांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.

राजेश टोपे यांचं ट्विट

सतत पाठपुरावा केल्याने मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना अखेर न्याय मिळाला.बलिदान दिलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाने आज 10 लक्ष रुपये मदत वितरित केली आहे.

https://twitter.com/rajeshtope11/status/1465307445681475586?s=19

एकूण ३४ कुटुंबियांसाठी मदतीची रक्कम

मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये देण्याच्या आश्वासनाची महाविकास आघाडीने पूर्तता केली असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकूण ३४ कुटुंबियांसाठी मदतीची रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आली आहे. सदर कुटुंबाना १० लाख रूपये देण्याची घोषणा मागील सरकारच्या काळात करण्यात आली होती.परंतु, प्रत्यक्षात केवळ १५ कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रूपये देण्यात आले होते. मागील सरकारचे हे आश्वासन महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल व या कुटुंबियांना राज्य शासनाकडून प्रत्येकी १० लाख रूपये देण्यात येतील, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समन्वयकांना दिला होता. त्यानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ कोटी ६५ लाख रूपयांचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आला आहे. आजवर शासनाची मदत न मिळालेल्या १९ वारसांना प्रत्येकी १० लाख तर यापूर्वी ५ लाख रूपये मिळालेल्या १५ वारसांना प्रत्येकी आणखी ५ लाख रूपये या निधीतून दिले जातील.


Next Story
Share it
Top
To Top