Loudspeaker: नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईत 2 गुन्हे दाखल

Loudspeaker: नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईत 2 गुन्हे दाखल

मुंबई | मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांवरून जो आक्रमक पवित्रा घेतला आहे, त्यामुळे राज्यासह देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. अशातच आता मुंबईतील लाऊडस्पीकरबाबत सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत. त्यानुसार अजान लावता येणार आहे. मात्र, भोंग्यावरून वातावरण तापलेले असताना, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन न करता अजान वाजवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन गुन्हे नोंदवले आहेत.


मुंबई पोलिसांनी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेतच अजान वाजवण्याला परवानगी दिली आहे. तेही भोंग्यासाठी निश्चित केलेल्या डेसिबलच्या नियमानुसार, मात्र वांद्रेच्या नुरानी मस्जिद बाजार येथे पहाटेची अजान पुकारल्या प्रकरणी कलम १८लाऊडस्पीकर८, भादंविसह ३७ (१), (३) १३५ महाराष्ट्र पोलीस अॅक्ट, तसेच १९५१ सह ३३ आर (३), ध्वनी प्रतिबंधक नियम भादवी नुसार एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याशिवाय सांताक्रूझच्या लिंक रोडवरील कबरस्तान मस्जिद येथे भोंग्याची परवानगी घेतली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे पालन न केल्याप्रकरणी दोन जणांवर कलम 188, 34 भादंविसह 33 (1) म पो का 1951,33 (1)(त)(3) म पो का ,131 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.


Next Story
Share it
Top
To Top