"टीका करणं सोपं असतं" - अब्दुल सत्तारांचा इम्तियाज जलीलांवर निशाणा

टीका करणं सोपं असतं - अब्दुल सत्तारांचा इम्तियाज जलीलांवर निशाणा

औरंगाबाद | नगर आणि नाशिक जिल्ह्यातील नेत्यांनी सत्तेचा वापर करून पाणी अडवल्यामुळे मराठवाड्यात पाण्याची तूट निर्माण झाली आहे असे वक्तव्यं शिवसेना नेते आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. सत्तार आज औरंगाबादमधील तापडीया नाट्यगृहात पाणी परिषदेत बोलत होते. यावेळी सत्तार यांनी एसआयएमचे MIM इम्तियाज जलील यांना टीका करणं सोप्प असतं मात्र काम मार्गी लावणे अवगड असतं असं म्हणत टोला लगावला आहे.

एक उंगली हमारे तरफ है तो चार उंगलीया आपके तरफ है

या पूर्वीही औरंगाबादच्या पाणी पुरवठ्याचे उद्घाटन झाले मात्र त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते म्हणून ही योजना रखडली होती मात्र आता मा.उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि ते ही योजना पूर्ण करतील तसेच येत्या दीड वर्षात औरंगाबादची पाणी पुरवठा योजना पुर्ण होईल असंही ते यावेळी म्हणाले. दरम्यान उद्या एसआयएमचे MIM इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) उपहासात्मक आंदोलन करणार आहेत या पार्श्वभूमीवर सत्तार यांनी ही टीका केली आहे 'एक उंगली हमारे तरफ है तो चार उंगलीया आपके तरफ है' हे इम्तियाज यांनी विसरू नये. तसेच टीका करण सोपं असते हे देखील जलील यांनी विसरू नये असा टोलाही मंत्री अब्दुल सत्तार यांनी इम्तियाज जलील यांना लगावला आहे


Next Story
Share it
Top
To Top