शरद पवारांवर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी केतकी चितळेला घेतले ताब्यात

शरद पवारांवर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी केतकी चितळेला घेतले ताब्यात

मुंबई | अभिनेत्री केतकी चितळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणे हे केतकीला भोवले आहे. या प्रकरणी केतकीला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले. केतकीने काल (१३ मे) तिच्या फेसबुक पोस्टवर शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक पवित्र घेतला. या प्रकरणी केतकीविरोधात ठाण्याच्या कळ्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी गुन्हा दाखल केला होता. कळव्यात केतकीविरोधात पोलीस ठाण्यात कलम ५००, ५०५ (२), ५०१, आणि १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुण्यात आज (१४ मे) राष्ट्रवादीच्या संस्कृतिक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

दरम्यान, शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केतकीवर टीका केली. जितेंद्र आव्हाड म्हणाले, "८३ वर्षाच्या व्यक्तीबद्दल तुम्ही असे बलू शकत नाही. तुम्हाला पण बाप्प आहे ना. आणि त्यांनी लवकर वरती जावे, अशी तुम्ही प्रार्थना करता का?, तुमच्या बाप्पाला १०० वर्ष जगावे, अशी प्रार्थना करताना." मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत ट्वीट हँडलवरून तीव्र शब्दात निशेष व्यक्त केली आहे. "कोणीही महाराष्ट्राची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये, हीच अपेक्षा!," अशी कॅप्शन देऊन पत्र ट्वीट करत राज ठाकरेंनी केतकीवर टीका केली आहे.
Next Story
Share it
Top
To Top