शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला 18 मेपर्यंत पोलीस कोठडी

शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला 18 मेपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायालयाने १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ठाणे पोलिसांनी केतकीला काल (१४ मे) ताब्यात घेतले होते. यानंतर केतकीला आज (१५ मे) ठाणे न्यायालयाने १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ठाणे पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी वेळ हवा आहे. त्यामुळे सुनावणीदरम्यान ठाणे पोलिसांनी न्यायालयात केतकीची पोलीस कोठडीची मागणी केली होती. केतकीने न्यायालयात वकील न घेता स्वत: युक्तीवाद केला होता. "मी राजकीय व्यक्ती नाही, मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का?," असे युक्तीवात केतकीने स्वत: न्यायालयात केला आहे. या प्रकरणात राज्यभरात केतकी विरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत.

या प्रकरणी केतकीविरोधात ठाण्याच्या कळ्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी गुन्हा दाखल केला होता. कळव्यात केतकीविरोधात पोलीस ठाण्यात कलम ५००, ५०५ (२), ५०१, आणि १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. गोरेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारींनी केतकीचा ताबा घेण्यासाठी ठाणे न्यायालयात हजर होते. परंतु, ठाणे न्यायालयाने तिला १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाणे न्यायालयाच्या बाहेर मोठ्या संख्येने गर्दी केली होती. केतकीविरोधात कळवा, पुणे, अकोला, पिंपरी-चिंचवड, धुळे, सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव गुन्हा दाखल केला.
Next Story
Share it
Top
To Top