खंबाळे-शिदवाडी शिवारातील पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

खंबाळे-शिदवाडी शिवारातील पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

नाशिक | खंबाळे-शिदवाडी येथील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत एक कोटी ९२ लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे; वर्षभरात या योजनेचे काम पूर्ण करून ही पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.

इगतपुरी तालुक्यातील डहाळेवाडी (खंबाळे) येथील खंबाळे-शिदवाडी शिवारात जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत १ कोटी ९२ लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते गावकऱ्यांशी संवाद साधत असतांना बोलत होते. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, इगतपुरी तालुक्यातील डहाळेवाडी (खंबाळे) येथील खंबाळे-शिदवाडी शिवारात नळपाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबवून कामला सुरुवात करावी. पावसाळ्यापूर्वी जॅकवेलची कामे पूर्ण करून पाण्याच्या टाकीसाठी आवश्यक असणारी जागेबाबत कार्यवाही करावी, असेही ठाकरे यांनी सांगितले.


खंबाळे येथील कोल्हापुर साठवण बंधाऱ्याचा गाळ काढून स्वच्छता करण्यासोबतच कावनईचा इतिहास पाहता पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यात येईल. यावेळी आदिवासी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडविण्याबरोबरच मूलभूत सुविधा देण्याचे आश्वासनही आदित्य ठाकरे यांनी दिले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, निर्मला गावित, सरपंच गणेश गोडे, उपसरपंच दिपाली चौधरी, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., इगतपुरी प्रांत अधिकारी तेजस चव्हाण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, अधीक्षक अभियंता सुनंदा नरवाडे, कार्यकारी अभियंता सुबोध मोरे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पुरुषोत्तम भांडेकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे आदी उपस्थित होते.

Next Story
Share it
Top
To Top