"ST संपासंदर्भात लवकरच तोडगा निघेल!", पवारांशी सकारात्मक चर्चेनंतर राऊतांचं आश्वासन

ST संपासंदर्भात लवकरच तोडगा निघेल!, पवारांशी सकारात्मक चर्चेनंतर राऊतांचं आश्वासन

मुंबई | "शरद पवारांनी एसटी संपासंदर्भात त्यांची काही भूमिका आहे. शरद पवार, अजित पवार आणि अनिल परबांशी काल (२२ नोव्हेंबर) चर्चा केली. पवारांनी एसटी संपासंदर्भात त्यांच्या बोलण्यातून मला असे वाटते की, काहीतरी तोडगा लवकरच निघेल, असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज (२३ नोव्हेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी वाय. बी. सेंटरमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर राऊतांनी माध्यमांशी बोलताना म्हणालं.

"एसटीचा विषय हा गंभीर आहे. असे जर तुम्हाला वाटत असेल. तरी मला खातरी आहे. लवकरच तो विषय सुटेल. शरद पवारांनी एसटी आंदोलनासंदर्भात त्यांची काही भूमिका आहे. शरद पवार, अजित पवार आणि अनिल परबांशी काल चर्चा केली. पवारांनी एसटी आंदोलनासंदर्भात त्यांच्या बोलण्यातून मला असे वाटते की, काहीतरी तोडगा लवकरच निघेल, असे राऊतांनी बैठकीतनंतर माध्यमांना सांगितले.

महाराष्ट्रातील वातावरण कोण भडकवत

"महाराष्ट्रातील वातावरण कोण आणि का भडकवत आहे ? आणि त्यांचा या मागचा हेतू सर्वांना माहीत आहे. एसटी आंदोलनात तेल ओतण्याचं काम कोण करत आहे, हे देखील आम्हाला माहती आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबद्दल सर्वांनाच सहानुभूती आहे. सरकार करून जे शक्य आहे, ते सरकार करत आहे. शरद पवारांनी परिवहन मंत्र्यांना काल झालेल्या बैठकीत काही सकारात्मक सूचना दिल्या आहेत," राऊतांनी भाजपवर टीका केली आहे.


Next Story
Share it
Top
To Top