HW News Marathi
Covid-19

तब्बल तीन महिन्यानंतर झी मराठीच्या ‘या’ मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात

मुंबई | अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या झी मराठीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेला प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे मालिकेचे चित्रीकरण सपूर्णपणे ठप्प झाले आहे. मात्र, तब्बल तीन महिन्यानंतर मालिकेच्या चित्रीकरणाला आज (२६ जून) सुरुवात होत आहे. या मालिकेतील सर्व कलाकार पुण्यातून मुंबईत आल्यानंतर जवळपास १५ दिवस कलाकार क्वारंटाईन होते. मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाल्यामुळे प्रेक्षक आणि चाहत्यांसाठी नवीन भाग पाहाला मिळणार आहे.

दरम्यान, राज्य शासनाने काही अटी -शर्तींच्या अधीन राहून चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी मालिकांच्या चित्रीकरणास मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे मनोरंजन, चित्रपट क्षेत्राला मोठा दिलासा मिळाल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी काल (२५ जून) सांगितले.

कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी यांच्या चित्रीकरणासंदर्भात राज्य शासनाने ३० मे २०२० रोजी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करताना संबंधित संस्था/संघटना यांना येत असलेल्या काही अडचणींमुळे सांस्कृतिक विभागामार्फत ३० मे २०२० रोजी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांबाबतचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. संबंधित संस्थांनी या स्पष्टीकरणात्मक सूचनांनुसार कार्यवाही करावी. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा सांकेतांक २०२००६२४११०९३७८२३ असा आहे.

संबंधित बातम्या

मार्गदर्शक तत्वे जाहीर झाल्याने चित्रीकरणाला वेग येणार | सांस्कृतिक कार्यमंत्री

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लीलावती रुग्णालयात दाखल

News Desk

रुग्णसेवेचं अखंड व्रत घेवून अहोरात्र सेवा देणाऱ्या कोरोना योध्यांच्या रूपातील डॉक्टरांना राजेश टोपे यांचे पत्र

News Desk

राज्यात परतणाऱ्या परप्रांतीय श्रमिक व कामगारांची स्थलांतरित कायद्यान्वये नोंदणी करावी !

News Desk