राज्यातील ५ ड्रग्ज केस एनसीबीकडे वर्ग करण्याचे अमित शहांचे आदेश

राज्यातील ५ ड्रग्ज केस एनसीबीकडे वर्ग करण्याचे अमित शहांचे आदेश

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्य आणि केंद्र असा वाद रंगलेला आपण पाहिला आहे. हा वाद संपण्याच्या ऐवजी आता पुन्हा एकदा वाढण्याचे चिन्हे दिसत आहे. याचे कारण म्हणजे आता महाराष्ट्राच्या डीजीपीला एनसीबीच्या डीजीपीने पत्र लिहून पाच महत्त्वाचे ड्रग्ज केस वर्ग करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचे नमूद केल्याची माहिती प्रसार माध्यमांनी दिली आहे.

राज्यातील पाच ड्रग्ज केसे शहांच्या आदेशानुसार एनसीबीच्या ताब्यात घेण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा एनसीबी आणि एनसीपी यांच्यातील संघर्ष पाहायला मिळणार आहेत. एनसीबीच्या डीजीपीने राज्याच्या डीजीपीला पत्र लिहिले आहे. यावर महाविकासआघाडीचे मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मलिक म्हणाले, एनसीबीला जे पाच केसे वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या पाच केसेस कोणत्या निकषावर एनसीबीला वर्ग करण्यात आले आहेत, असे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसापूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्यानंतर बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण समोर आले. यानंतर एनसीबीने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींना ड्रग्ज प्रकरणात चौकशी करण्यात आली होता. यानंतर मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानला एनसीबीला अटक करण्यात आले होते. सध्या आर्यन हा जामीनावर असून दर शुक्रवारी त्याला एनसीबीच्या कार्यलयात हजेरी लावावी लागते.


Next Story
Share it
Top
To Top