लोकांना बाबासाहेब आंबेडकरांची थोरवी कळू नये म्हणून काँग्रेसने...!; शहांचे गंभीर आरोप

लोकांना बाबासाहेब आंबेडकरांची थोरवी कळू नये म्हणून काँग्रेसने...!; शहांचे गंभीर आरोप

मुंबई । केंद्रीय मंत्री अमित शाह हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी (१९ डिसेंबर) ते पुण्यात असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पायाभरणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं त्यांच्या हस्ते लोकार्पणही झालं आहे. दरम्यान, याच कार्यक्रमात बोलताना अमित शहांनी आपल्या टिकांची धार वाढवत काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. "काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत आणि नंतरही सातत्याने त्यांचा अपमान केला", असा गंभीर आरोप अमित शहांनी केला आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान लिहून या देशाला आकार दिला. देशाच्या विकासात बाबासाहेब आंबेडकरांनी मोठं योगदान दिलं आहे. मात्र काँग्रेसने त्यांच्या हयातीत आणि नंतरही सातत्याने त्यांचा अपमान केला आहे. काँग्रेसची सत्ता असताना बाबासाहेबांना भारतरत्न दिला गेला नाही. इतकंच नव्हे तर देशातील जनतेला बाबासाहेबांचं काम आणि थोरवी कळू नये म्हणून काँग्रेसने कधीच संविधान दिवस साजरा केला नाही", अशा गंभीर टीका अमित शहांनी केल्या आहेत.

"मोदी भारताच्या संविधानाला ग्रंथ मानून देश चालवतायत!"

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, "देशात पंतप्रधान मोदींचं सरकार आल्यानंतर 'संविधान दिवस' साजरा होऊ लागला. मात्र, जेव्हा जेव्हा संविधान दिवस साजरा झाला तेव्हा तेव्हा काँग्रेसने त्यावर बहिष्कार टाकला." यापुढे अमित शहांनी असा दावाही केलाय की, "मोदीही भारताच्या संविधानाला आपला ग्रंथ मानूनच देश चालवत आहेत." दरम्यान, एकंदरीतच अमित शहांच्या या गंभीर टिकांनंतर भाजप आणि काँग्रेसमधला वाद पेटण्याची चिन्हं आहेत.


Next Story
Share it
Top
To Top