माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर ईडी कार्यालयात हजर

माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर ईडी कार्यालयात हजर

मुंबई | गेल्या अनेक महिन्यांपासून अनिल देशमुख ईडी समोर जात नव्हते मात्र , आता त्यासंबंधी एक मोठी बातमी समोर येतेय. १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीने वारंवार समन्स बजावलं होतं. मात्र, अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले नव्हते. त्यांची ५ कोटींची संपत्ती देखील जप्त करण्यात आली होती. तसेच त्यांच्याविरोधात विविध वॉरंट जारी करण्यात आले होते.

मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्यास नकार दिल्यानं आज अखेर अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून अनिल देशमुख आणि कुटुंबीय गायब होते. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी चार ते पाच वेळा धाडी टाकण्यात आल्या होत्या, मात्र तरीही देशमुख ईडीसमोर हजर राहिले नव्हते.


Next Story
Share it
Top
To Top