मंत्री अनिल परब यांना ईडीचे दुसरे समन्स, परब यांनी किरीट सोमय्यांवर दाखल केला 100 कोटींचा मानहानी दावा

मंत्री अनिल परब यांना ईडीचे दुसरे समन्स, परब यांनी किरीट सोमय्यांवर दाखल केला 100 कोटींचा मानहानी दावा

मुंबई | भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात परब यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत परब यांनी भाजपच्या माजी खासदारांवर 100 कोटींची बदनामी केल्याचा दावा केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर कोकणातील दापोलीमध्ये बेकायदेशीर हॉटेल बांधल्याचा आरोप केला होता. यासोबतच परिवहन विभागात ट्रान्सफर रॅकेट चालवल्याचा जाहीर आरोपही सोमय्या यांनी केला होता.

सचिन वाझे यांनी एनआयएला दिलेल्या एका पत्रात देशमुख यांच्यासाह परब यांच्यावरही गंभीर आरोप केले

अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा एकदा महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या विरोधात समन्स जारी केले आहेत. ईडीने परिवहन मंत्र्यांला 28 सप्टेंबरला चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी ईडीने परब यांना आधी 31 ऑगस्टला चौकशीसाठी बोलावले होते. परंतु, त्यांनी एक लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्राचे राज्यमंत्री म्हणून काही वचनबद्धता दाखवून काही वेळ मागितला होता. अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याप्रकरणी अटकेत असलेले मुंबईचे माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी एनआयएला दिलेल्या एका पत्रात देशमुख यांच्यासाह परब यांच्यावरही गंभीर आरोप केले होते. बेकायदेशीर वसूली आणि कंत्राटदारांकडून पैसे उकळण्याचा आरोपही सचिन वाझे यांनी पत्रात केला होता.

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी वाझेनी केलेले आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, मी एक खरा शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या दोन मुलींची शपथ घेऊन सांगतो की, मी सचिन वाझेला असे काही करण्यास सांगितले नाही. सचिन वाझेनी माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. आम्ही पुढील मंत्र्यांला लक्ष्य करु असे भाजपने आधीच सांगितले होते असेही ते यावेळी म्हणाले.


Next Story
Share it
Top
To Top