HW News Marathi
महाराष्ट्र

कोविड, ओमायक्रोनचा प्रसार रोखण्याकरिता ठाणे जिल्ह्यात सुधारित निर्बंध लागू

ठाणे | ठाणे जिल्ह्यात कोविड आणि ओमायक्रोनचा प्रसार होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य शासनाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आणखी कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार आता लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, क्रीडा स्पर्धा, संमेलने/मेळावे, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी ३१ डिसेंबर २०२१ च्या मध्यरात्रीपासून सुधारित निर्बंध लागू झाले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या परिपत्रकानुसार, बंदिस्त ठिकाणी किंवा खुल्या दालनात संपन्न होणाऱ्या लग्न समारंभांसाठी उपस्थितांची मर्यादा १०० वरून ५० करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे दालनात किंवा खुल्या जागेत होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमांसाठी ही सदर मर्यादा ५० करण्यात आली आहे. तसेच अंतिम संस्कारासाठी केवळ २० लोकांना मुभा देण्यात आली आहे. याशिवाय यापूर्वी २७ नोव्हेंबर २०२१ व २४ डिसेंबर २०२१ रोजीच्या आदेशानुसार लागू करण्यात आलेले इतर निर्बंध कायम राहणार आहेत.

आदेशांचे उल्लंघन केल्यास कारवाई

या निर्बंधाचे उल्लंघन केल्यास किंवा आदेशाचे पालन करण्यास टाळाटाळ केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथरोग नियंत्रण अधिनियम व भारतीय दंड संहितेनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी कळविले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्या होणारा दसरा मेळावा डोंगर कपारीतील कष्टकऱ्यांचा, वंचितांचा – पंकजा मुंडे

News Desk

पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा! – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

Aprna

“औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक होणाऱ्यांशी…” – संजय राऊत

Manasi Devkar