HW News Marathi
महाराष्ट्र

रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला; चंद्रकांत पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

जळगाव | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या आणि जळगाव जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला आहे. काल (२७ डिसेंबर) रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी रोहिणी खडसे यांच्या चारचाकी गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडली असून त्यावेळी त्यांच्या गाडीवर रॉडने देखील हल्ला करण्यात आला. सुदैवाने रोहिणी खडसे या हल्ल्यातून सुखरुप बचावल्या असून कुणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, या हल्ल्यानंतर जळगावातील राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, रोहिणी खडसे यांनी मागील आठवड्यापासून मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्याविरोधात आवाज उठविला असल्याने त्याच रागातून हा हल्ला झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील आणि खडसे कुटुंबियांत सध्या सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यामुळे आता राजकारणकीय वातावरण आणखीच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी देखील रोहिणी खडसे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. पक्ष कोणताही असो मात्र एक महिला म्हणून मी त्यांच्यासोबत आहे आणि महिलांवर अशा पध्दतीने हल्ले होत असतील तर ही अत्यंत चुकीची व निषेध करणारी घटना असल्याचेही त्यांनी म्हटले. यासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षकांनी बोलणे झाले असून संशयितांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी रक्षा खडसेंनी केली आहे.

नेमके काय घडले 

रोहिणी खडसे या काल चांगदेव येथून एका हळदीच्या कार्यक्रमानंतर मुक्ताईनगरकडे परतत असताना सूत गिरणी परिसरात दोन मोटार सायकलवर आलेल्या काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. हल्लेखोर एवढयावरच नाही थांबले तर त्यांनी रॉडने देखील त्यांच्या गाडीवर हल्ला केला. या घटनेनंतर त्यांच्या वाहन चालकाने रस्त्याच्या बाजूने गाडीसह शेतात पलायन केले. त्यामुळे रोहिणी खडसे आणि त्यांचा चालक सुखरुप बचावले, अशी माहिती खडसे कुटुंबीयांनी दिली आहे. तसेच हल्लेखोरांनी सुद्धा अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

चंद्राकांत पाटील यांच्याकडून हल्ल्याचा निषेध

रोहिणी खडसेवरील हल्ल्याचा चंद्राकांत पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे. गेल्या आठ दिवसापासून मुक्ताईनगरचे राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहेत. चंद्रकांत पाटील विरोध एकनाथ खडसे, असे समीकरण बनले आहे. एकनाथराव खडसे व रोहिणी खडसे आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत,, असे असतानाच काल रोहिणी खडसेंच्या गाडीवरती अज्ञात इसमाने हल्ला केलेला आहे. या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शुल्क विभागाचे धाडसत्र सुरू,१३ दिवसात १,४२९ गुन्ह्यांची नोंद

News Desk

राज्यात ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविणार

News Desk

गडचिरोलीत भूसुरुंगाच्या स्फोटात १५ जवान शहीद झाल्याची भीती

News Desk