औरंगाबाद,नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे मुख्यमंत्र्याचे संकेत..फटका कोणाला ?

औरंगाबाद,नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे मुख्यमंत्र्याचे संकेत..फटका कोणाला ?

मुंबई | राज्यामध्ये कोरोना वायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अनेक पक्षांचे कार्यक्रम ,सभा सर्व रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . दुसरीकडे येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांवरसुद्धा आता टांगती तलवार आहे. औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणुक सध्या सर्वचं पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांसोबत कोरोनासंबंधी पत्रकार परिषद घेतली .यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,नवीमुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणूक पुढे ढकलण्याबाबत निवडणूक आयोगाशी सरकार चर्चा करणार आहे. कोरोनामुळेउद्भवलेल्या स्थितीत निवडणूक प्रचार योग्य नाही म्हणून सरकार निवडणूक आयोगाशी चर्चा करणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंआहे.नवी मुंबई आणि औरंगाबाद मनपाच्या निवडणुका लवकरच होत आहेत. त्या पुढे ढकलण्याची मागणी विविध स्तरातून केलीजातेय.त्यामुळे एकीकडे मनसेने औरंगाबाद मनपासाठी तयारी करायला सुरूवात केलीये ,दुसरीकडे नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी,मनसे यापक्षांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत,त्यामुळे निवडणुका पुढे गेल्या तर फटका कोणाला बसणार आणि फायदा कोणाचा होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.


Next Story
Share it
Top
To Top