HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भाजपचा चंचू प्रवेश

बारामती | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एकहाती ताब्यात असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भाजपने चंचुप्रवेश केला असून हवेली तालुक्यातून भाजपचे उमेदवार प्रदीप कंद यांनी विजय मिळवला आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेही गेली अनेक वर्षे अजित पवारांच्या ताब्यात असलेल्या यांच्या नुकतेच निवडणूक  पार पडली असून त्याची आज (४ जानेवारी) मतमोजणी सुरू आहे. २१ पैकी १४ जागा याआधीच बिनविरोध झाल्या असून उर्वरित ७ जागांसाठी निवडणूक पार पडली होती.

हवेली अ वर्ग मतदार संघातून पूर्वीचे राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद हे भाजपतून उभे राहिले होते. त्यामुळे राष्ट्रवादी तर्फे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते असलेले सुरेश घुले यांना मैदानात उतरवले होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही जागा प्रतिष्ठेची केली होती. गद्दारांना त्याची जागा दाखवा, असे आवाहन अजित पवारांनी केले होते. मात्र याठिकाणी भाजपच्या प्रदीप कंद यांनी विजय मिळवला आहे. त्यांना ४०५ मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या सुरेश घुले यांना ३९१ मते मिळाली. विशेष म्हणजे कंद यांना पवारांच्या बारामतीतून निर्णायक ५२ मते मिळाल्याचे समजते. दरम्यान, त्यामुळे अनपेक्षितपणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भारतीय जनता पक्षाने चंचुप्रवेश केल्याचे बोलले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुप्रिया सुळेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा !

News Desk

दानवेंचा पराभव करत नाही तोवर …शिवसेनेच्या मंत्र्यांने उचलला विडा!

News Desk

जातीय द्वेष पसरवणं ही साधुसंतांची व्याख्या असते का? अमोल मिटकरींचा भाजपला सवाल

News Desk