HW News Marathi
महाराष्ट्र

ओबीसींच्या नावावर मंत्रीपद भूषवतात आणि फक्त फक्त प्रस्थापितांसाठी पोपटपंछी करतात! – गोपीचंद पडळकर

सांगली | “ओबीसींच्या नावावर मंत्रीपद भूषवतात आणि फक्त फक्त प्रस्थापितांसाठी पोपटपंछी करतात,” असा टोला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर केली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (१७ जानेवारी) सुनावणी होणार आहे. ठाकरे सरकारने आयोगाला अंतिरम अहवाल मागितला होता. पण, अद्याप आयोगाचे कामच सुरू झाले नाही तर अहवाल कसा देणार?,” असा सवाल पडळकरांनी उपस्थित केला आहे. 

पडळकर म्हणाले, “ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार व अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसती वाहवा मिळवत मागासवर्ग आयोगासाठी ४५० कोटींची घोषणा केली. वास्तविक फक्त मागे दिलेले साडेचार कोटी दिले. ते ही खर्च करण्याचे आदेशही आयोगाला मिळाले नाहीत. ना ऑफिस ना पुर्णवेळ सचिव, आयोगाचे संशोधक सोलापूरात तर आयोग पुण्यात ” वडेट्टीवारांनी टक्केवारीसाठी ‘फुकटचे घावले आणि गाव सारे धावले’अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली.” अशी टीका त्यांनी केली आहे.

“ओबीसींच्या नावावर मंत्रीपद भूषवतात आणि फक्त फक्त प्रस्थापितांसाठी पोपटपंछी करतात. आता तर हद्दच झाली उद्याच्या १७ जानेवारीला ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची सुनावणी आहे आणि त्या करिता उद्धव सरकारला आयोगाला अंतिरम अहवाल मागितला होता. पण आयोगाचे कामच सुरू नाही झाले तर अहवाल कसा देणार? आणि म्हणूनच दिशाभूल करण्यासाठी लगबगीने वडेट्टीवारांनी तीन महिन्याची मुदत न्यायालयाला मागणार, असे जाहीर केले. म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्रात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकी ओबीसी आरक्षणाशिवाय होणार, ओबीसींना राजकीय आरक्षण राहणार नाही आणि प्रस्थापित ओबीसींच्या राजकीय हक्कावरती डल्ला मारणार. मी महाराष्ट्रातील समस्त ओबीसी बांधवांना आवाहनही करतो की तुमच्या जीवावरती लालदिवा मिळवणारे आणि आपल्यालाच फसवणाऱ्या ओबीसी मंत्र्यांना जिथे भेटेल तिथे गाठा आणि जाब विचारा.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“जन-आशीर्वाद यात्रेला विरोध कराल तर…” भाजपचा शिवसेनेला थेट इशारा

News Desk

अंगरक्षक गोविंदाच्या निधनाने भावूक झालेल्या पंकजा मुंडेंची पोस्ट !

News Desk

कामचुकार अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री योगींचा थेट सरप्राईज कॉल

News Desk