HW News Marathi
महाराष्ट्र

राणीच्या बागेमध्ये परदेशातून दुर्मिळ प्राणी आणण्याच्या निविदेत १०६ कोटींचा भ्रष्टाचार; आमदार मिहीर कोटेचा आरोप

मुंबई | राणीच्या बागेमध्ये परदेशातून दुर्मिळ प्राणी आणण्याच्या निविदेत १०६ कोटींचा भ्रष्टाचार झाला असून ही संपूर्ण निविदा प्रक्रिया लवकरात लवकर थांबवावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश कोषाध्यक्ष आणि आमदार मिहीर कोटेचा यांनी केला आहे. ही निविदा प्रक्रिया जर न थांबल्यास भाजप आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. यासंदर्भात भाजपने मुंबई महापालिकेतील भाजप पक्षनेते विनोद मिश्रा, नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांनी केली आहे. भाजप प्रदेश कार्यालयात आज (२० जानेवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली.

यावेळी कोटेचा म्हणाले, “बीएमसीमधील रस्ते कामामधील घोटाळे भाजपने उघडकीस आणून त्यांनी पालिकेचे १३६ कोटी रुपये वाचविले. परिवहन महामंडळाच्या ई तिकीट यंत्र खरेदीमधील घोटाळा उघडकीस आणले आहे. तसेच आता पालिका कंत्राटदार टोळी राणीच्या दुर्मिळ प्राणी परदेशातून आणण्याच्या निविदेतही उतरली आहे. राणीच्या बागेत ब्लॅक जॅग्वार, चित्ता, व्हाईट लायन, चिंपांझी या सारखे प्राणी आणण्यासाठी बीएमसीने निविदा मागविल्या आहेत. १०० कोटींच्या वरच्या निविदेत परदेशी कंपन्याही यासाठी उतरू शकतात. त्यामुळे १८५ कोटींच्या निविदेचे दोन भाग करण्यात आले.

दरम्यान, परदेशातून दुर्मिळ प्राणी आणण्याच्या निविदेत भ्रष्टाचार असून रक्कमेपेक्षा अधिक रकमे असलेल्या पत्र बीएमसीच्या अतिरिक्त आयुक्तांना २० ऑक्टोबरला पाठविले होते. या पत्रा पालिका विनोद मिश्रांनी आयुक्तांना २१ ऑक्टोबरला पाठविले होते. यासंदर्भात हाय वे आणि स्काय वे या कंपन्यांनी १०६ कोटी अधिक रममेची निविद सादर केले आहे. तसेच १८८ कोटीच्या बोलीसाठी २९४ कोटींचा निविदा सार केल्याचे कोटेचा म्हटले आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कार नाल्यात कोसळून माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चुलत बहिण, मेव्हण्याचा मृत्यु

News Desk

‘मुंबई विमानतळावरील फलकावर अदानी ग्रूपकडून स्पष्टीकरण’, म्हणाले…!

News Desk

“खंडण्या वसूल करणारा खरा सचिन वाझे मंत्रालयाच्या ६व्या मजल्यावर होता की सिल्वर ओकवर?”

News Desk