HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटलांना ‘नवरत्न’ची बाटली देत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणाला, “यानेही डोकं शांत झालं नाही तर…”

मुंबई | राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा चांगलीच जुंपलेली पाहायला मिळत आहे. भाजप आणि महाविकासआघाडी सरकारमध्ये एकमेकांवर टीका करण्याची मालिकाच सुरु झाली आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच सांगलीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरीत टीका केली. त्यावर, आता राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांना चक्क नवरत्न तेलाची बॉटल भेट म्हणून पाठवली आहे. पुण्यातील या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे.

“आपण कुणाबद्दल बोलतो? आपली तेवढी उंची आहे का? बोलताना जरा डोकं शांत ठेवून टीका करत जा. म्हणूनच तुमचं डोकं शांत करण्यासाठी हे नवरत्न तेल पाठवत आहे. यानेही तुमचं डोकं शांत झालं नाहीच तर, मी स्वखर्चाने तुमचा इलाज करतो”, असा इशारा राष्ट्रवादीच्या या कार्यकर्त्याने दिला आहे. संदीप काळे असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. “आपल्याला शरद पवारचं आव्हान नाही. कारण ५४ आमदारांच्या पुढे आम्ही त्याला जाऊ दिलं नाही”, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

“राज्यात आपल्याला शरद पवारचं आव्हान नाही. कारण ५४ आमदारांच्या पुढे आम्ही त्याला जाऊच दिलं नाही. संपूर्ण आयुष्य गेलं तरी कधी तो ६० आमदारांच्या वर तो गेला नाही”, अशा एकेरीत भाषेत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्यानंतर, राष्ट्रवादीतील रोष वाढलेला पाहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेच्या नव्या झेंड्याला निवडणूक आयोगाची नोटीस

swarit

केंद्रात तुमचं काही चालत नाही की तिथं बोलायला घाबरता? – रोहित पवार

News Desk

मतांचे विभाजन टाळण्यासाठी मनसेने आमच्यासोबत यावे | अजित पवार

News Desk