चंद्रकांत पाटलांची उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर टीका; म्हणाले...

चंद्रकांत पाटलांची उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर टीका; म्हणाले...

पुणे | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनाही टोला लगावला आहे. याआधी आदित्य ठाकरे यांनी भाजप नेत्यांच्या राज्यपाल भेटीवरून टीका केली होती. त्यावर उत्तर देताना पाटील म्हणाले की 'अरे बाबा, तुझे बाबा आम्हाला भेटत नाहीत. तर मुख्यमंत्र्यांची भाषा ही तोडेन, ठोकेन, दाखवून देईन अशी असल्याचंही पाटील यांनी म्हंटलंय. त्यामुळे आम्हाला राज्यपालांना भेटावं लागतंय. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


बाळासाहेब ठाकरे यांची काल (२३ जानेवारी) जयंती होती. त्यानिमित्ताने उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली होती. तर त्यांच्या या भाषणावरून चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. पाटील म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांसमोर जे भाषण केले ते पूर्वीच्या आणि आताच्या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणासारखे होते. त्यांचं कालचं भाषण म्हणजे थयथयाट होता. त्यांच्या सगळ्या भाषणात ठोकेन, मारेन, तोडेन, सोडणार नाही यासारखे शब्द ते वापरत असतात. तसेच ही सर्व भाषणं सारखीच आहेत", असं त्यांनी म्हंटलंय.

तसेच पाटील पुढे बोलताना म्हणाले की, पंचायत निवडणुकांमधील शिवसेनेची स्थिती ही विचार करायला लावणारी आहे. आपल्या पक्षाचा ऱ्हास होत चालला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आता हातपाय मारण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीकाही पाटील यांनी यावेळी केली आहे. निराशा व्यक्त करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने मारेन, तोडेन अशी भाषा योग्य नाही, असंही त्यांनी म्हंटलं आहे.


तुम्ही हिंदुत्व सोडलंय की नाही हे काँग्रेसला सांगा

चंद्रकांत पाटलांची उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर टीका; म्हणाले...

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी राजभवन हा भाजपचा अड्डा झाला असल्याची टीका केली होती. यावरही पाटलांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, "अरे, तुझे बाबा म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री हे एका राष्ट्रीय स्तरावरच्या पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षालाही भेटायला तयार नाहीत. तर घटनेनुसार महाराष्ट्रात राज्यपाल हे सर्वोच्च आहेत आणि म्हणून आम्ही राज्यपालांना भेटायला गेलो. मात्र, मुख्यमंत्री फोनवरही उपलब्ध नसतात. जर तुम्ही उपलब्ध असाल तर प्रताप सरनाईकांविरोधात कारवाई करा", असं पाटील म्हणाले. तसेच शिवसेना वारंवार हिंदुत्वाचे विषय काढत आहे. तुम्ही हिंदुत्व सोडलंय की नाही हे काँग्रेसला सांगा, आम्हाला सांगण्याची गरज नाही, असंही पाटील म्हणाले.


Next Story
Share it
Top
To Top