“आज आले नसते तर फरार घोषित केले असते, ते टाळण्यासाठीच…”- चंद्रकांत पाटलांचा टोला

“आज आले नसते तर फरार घोषित केले असते, ते टाळण्यासाठीच…”- चंद्रकांत पाटलांचा टोला

मुंबई | अनिल देशमुखांना ईडीने 5 वेळा समन्स बजावून देखील ते हजर राहिले नव्हते. त्यांच्या ऐवजी त्यांचे वकील इंद्रपाल सिंह हे ईडी कार्यालयात पोहोचले होते. देशमुख यांचे वय 75 वर्षे आहेत आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे ते हजर राहू शकत नाहीत असा युक्तिवाद करण्यात आला होता. मात्र ते आज ईडी कार्यालयात हजर झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीही त्याच्यावर निशाणा साधला आहे.

जर ते आज ईडीसमोर आले नसते तर,…

अनिल देशमुख ईडीसमोर हजर झाल्यानंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'अनिल देशमुख हे आज प्रकट झाले पण मग ते या पूर्वीच का आले नाहीत? आता काय कारवाई करायचे ते ईडी ठरवले. जर ते आज ईडीसमोर आले नसते तर त्यांना फरार घोषित करण्यात आले असते. ते टाळण्यासाठीच ते आज ईडी कार्यालयातमध्ये दाखल झाले आहेत. हे सर्व प्रयत्न अटक टाळण्यासाठी करेले जात तआहेत. मात्र, त्यांना शरण जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.


Next Story
Share it
Top
To Top