'राज्य शासनाला शेतकऱ्यांच्या समस्यांपेक्षा शाहरुखच्या मुलाची चिंता!'- चंद्रकांत पाटील

राज्य शासनाला शेतकऱ्यांच्या समस्यांपेक्षा शाहरुखच्या मुलाची चिंता!- चंद्रकांत पाटील

सोलापूर | गेल्या 17 महिन्यांपासून वेतन न झाल्याने राज्यातील 29 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. अतिवृष्टीत 38 लाख हेक्‍टरवरचे पीक तर मराठवाड्यातील जमिनी वाहून गेल्या आहेत. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. शेतकरी, कर्मचारी यांच्या समस्यांपेक्षा राज्य शासनाला केवळ शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या सुटकेची चिंता सतावत आहे, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, राज्यात शेतकरी, कर्मचारी, ऊसबिल थकबाकी आदी समस्या सतावत असताना, राज्य शासन केवळ आर्यन प्रकरणात अधिक रस दाखवत आहे.

शेतकरी, कर्मचारी, ऊसबिल थकबाकी आदी समस्या सतावत असताना, राज्य शासन केवळ आर्यन प्रकरणात

बॉलिवूडच्या प्रत्येक विषयामध्ये राज्य शासनाचा सुरू असलेला हस्तक्षेप पाहता एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मला प्रश्‍न पडतो की, राज्यातील सर्व समस्या संपल्या आहेत की काय? केवळ आर्यन प्रकरण तेवढेच महत्त्वाचा विषय आहे का, असाही सवाल त्यांनी केला. चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, राज्यात शेतकरी, कर्मचारी, ऊसबिल थकबाकी आदी समस्या सतावत असताना, राज्य शासन केवळ आर्यन प्रकरणात अधिक रस दाखवत आहे. बॉलिवूडच्या प्रत्येक विषयामध्ये राज्य शासनाचा सुरू असलेला हस्तक्षेप पाहता एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मला प्रश्‍न पडतो की, राज्यातील सर्व समस्या संपल्या आहेत की काय? केवळ आर्यन प्रकरण तेवढेच महत्त्वाचा विषय आहे का, असाही सवाल त्यांनी केला.

राज्याचा कारभार नेमके कोणत्या दिशेने चालले आहे? असा सवाल उपस्थित करत, महाआघाडीतच एकी नाही, शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे हे सरकार असल्याचे म्हणत शासनाच्या कारभारावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी चांगलेच तोंडसुख घेतले.


Next Story
Share it
Top
To Top