HW News Marathi
महाराष्ट्र

नागरिक-स्नेही उपक्रमांमुळे महाराष्ट्रातील चार शहरांचा केंद्राकडून गौरव

मुंबई | केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं ‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ चॅलेंज अर्थात जनतेसाठी पदपथ या स्पर्धेच्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे. या स्पर्धेअंती ११ शहरांना पुरस्कार जाहीर झाले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, नागपूर, पुणे आणि पिंपरी चिंचवड या ४ शहरांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी एकूण ३८ शहरांचे प्रस्ताव दाखल झाले होते.

शहरांतील वाहन-केंद्री रस्त्यांचे लोक-केंद्री रस्त्यांमध्ये परिवर्तन करण्याच्या हेतूने वर्ष २००६ मध्ये लागू करण्यात आलेल्या राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरणातील शिफारसींच्या धर्तीवर २०२० पासून सुरु करण्यात आलेल्या स्मार्ट शहरे मोहिमेमध्ये सार्वजनिक जागा अधिक लोक-स्नेही बनविण्यासाठी देशातील शहरांमध्ये स्पर्धा सुरु करण्यात येतात.

‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ या स्पर्धेत परीक्षकांनी पुढील फेरीत प्रवेश करणाऱ्या ११ शहरांची निवड केली असून त्यांना मंत्रालयातर्फे प्रत्येकी ५० लाख रुपयांचे पारितोषिक देखील देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी आयटीडीपी अर्थात वाहतूक आणि विकास संस्थेकडून तंत्रज्ञान विषयक मदत घेण्यात आली.

‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील शहरांनी आघाडी घेतली असून ज्या चार शहरांची पुढच्या फेरीसाठी निवड झाली त्या शहरांतील उपक्रमांचा तपशील खाली दिला आहे.

पुणे

पुणे प्रशासनाने अनेक रस्त्यांच्या, बाजूच्या मोकळ्या जागा वापरून नागरिकांसाठी सुरक्षित आणि आकर्षक मनोरंजन विभाग तयार केले. रस्त्यांच्या बाजूच्या भिंतींवर आकर्षक चित्रे काढणे, परिसरात हास्यवर्गांचे, संगीत सत्रांचे आयोजन तसेच लहान मुलांसाठी खेळण्याची जागा निर्माण करणे अशा अनेक नव्या उपक्रमांनी रस्त्यांच्या आजूबाजूची जागा उपयोगात आणण्यात आली.

पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवड प्रशासनाने त्यांच्या रस्ते रचनाकारांशी सल्लामसलत करून त्यांच्या शहरामधील हिरवाईच्या जागांना जोडणाऱ्या शहरव्यापी हरित सेतू महायोजनेची आखणी केली. गाड्यांच्या रस्त्यांचे विभाजन करून सायकल मार्ग आणि पदपथासाठी वेगळ्या मार्गांची निर्मिती देखील प्रायोगिक तत्वावर करण्यात आली. या शहरात चालणे आणि सायकल चालविणे अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने सुधारणा केल्या आहेत.

औरंगाबाद

रस्त्यांचा वापर कारसारख्या वाहनांऐवजी नागरिकांना मुक्तपणे वापरू देण्यासाठी सर्व सार्वजनिक संस्था आणि इतर भागधारकांमध्ये एकमत घडवून आणण्यात औरंगाबाद महानगरपालिका प्रशासन यशस्वी ठरले. मोकळ्या रस्त्यांना सुशोभित करण्यासह नागरिकांना कमी शुल्कात, रस्त्यांच्या कडेला विरंगुळ्यासाठी जागा उपलब्ध करून देणे तसेच चालणाऱ्या आणि सायकल चालविणाऱ्यांसाठी रस्त्यांची उत्तम सोय करणे असे उपक्रम प्रशासनाने राबविले.

नागपूर 

 

नागपूर शहरातील सीताबर्डी आणि साक्कदरा या अत्यंत गर्दीच्या बाजारांमध्ये चालणाऱ्या लोकांसाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नागपूर शहर प्रशासनाने रस्त्यांच्या धोरणात्मक पुनर्रचना केल्या. शहरातील रस्त्यांच्या लगत विविध रंग वापरून चित्रे, जुने टायर वापरून बसण्याची ठिकाणे तसेच टाकाऊ धातूच्या वस्तूंपासून नव्या पदपथांची सीमा आखणे यासारखे अनेक उपक्रम राबविण्यात आले. यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकार आणि इतर संबंधितांची मदत घेण्यात आली.

या स्पर्धेतील काही विजेत्या शहरांनी पुढील संकल्पना राबविल्या –

गुरगाव शहरातील शाळांचे परिसर तसेच बाजाराची ठिकाणे केवळ पादचाऱ्यांसाठी राखीव करण्यात आले असून उज्जैन शहराने कारमुक्त विभाग निर्माण केला, उदयपुर शहराने स्थानिक बस स्थानकाकडे येणाऱ्या वाहतुकीची पुनर्रचना केली, कर्नाल शहराने ओसाड जागा आणि उड्डाणपूलाखालील जागांना रंगीबेरंगी कलाकृतींनी जिवंत केले. तर कोहिमाने कलाकृती प्रदर्शनासाठी वस्तूसंग्रहालयाची कल्पना राबविली.

केंद्र सरकारने ‘स्ट्रीट्स फॉर पीपल’ स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाची घोषणा केली आहे. पहिल्या फेरीतील ११ विजेती शहरे वगळता कोणतीही स्मार्ट शहरे, राजधानीची शहरे किंवा ५ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेली शहरे या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकऱ्यांना मदतीसाठी एक दिवसाचा पगार द्या, सरकारचं कर्मचाऱ्यांना आवाहन

News Desk

शरद पवारांचं वयं वाढतयं तसा त्यांचा हिंदू धर्माबाबत रागही वाढतोय !

News Desk

शिवसेनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला नारायण राणेंनी दिलं जबरदस्त उत्तर

Ruchita Chowdhary